Testimonials

लोकमंगल या नावातच जनसामान्यांचे हित उमजते. लोकमंगल हा उद्योग समूह नसून एक सुंदरशी कुटुंब प्रणाली आहे. आजमितीला सोलापूर जिल्हा हा सर्व लोकमंगलमय झाला आहे. लोकमंगलमुळे आज २५ हजार हातांना काम मिळाले आहे.

महेश दत्तात्रय साठे

आज लोकमंगल म्हटलं की एक विशिष्ट, मानसन्मान, नावलौकिक मिळालेला समूह म्हणून ओळखला जातो. लोकमंगल या छोट्याश्या रोपट्याचं रूपांतर फळा फुलांनी बहरलेल्या वटवृक्षात झाले आहे.

विजया कृष्णात साठे

लोकमंगल समूहाला एक किनारा आहे की, ज्या किनार्‍याला समाजकारण, अर्थकारण सारख्या बाजू आहेत. त्यामुळेच लोकमंगल समूहाला आज देशात मानाचं स्थान आहे. सांस्कृतिक, आध्यात्मिक, औद्योगिक क्षेत्रात विकासाची आणि उन्नतीची दिशा देण्यासाठी ही संस्था प्रयत्नशील आहे.

स्नेहाली जयकर साळुंखे

जसे लोकांनी लोकांसाठी लोकांमार्फत चालविलेले राज्य म्हणजे लोकशाही तसेच लोकमंगल म्हणजे एक सामाजिक चळवळ. लोकमंगलचा दबदबा हा समाजकार्यात सदैव राहणार आहे.

श्री. यशवंत बिराजदार

लोकमंगल सामुदायिक विवाह सोहळा ही मला एक वेगळी चळवळ वाटली. पहिल्या दिवसापासून मी या चळवळीत होतो. गोर गरिबांना प्रतिष्ठा, सन्मान मिळावा यासाठी ही चळवळ आहे.

नरेंद्र गोविंद काळे

लोकमंगल या संस्थेने कुठल्याही प्रकारचा स्वार्थ न बघता समाजाच्या हितासाठी सामुदायिक विवाह सोहळा हा उपक्रम हाती घेतला आहे. या सोहळ्यात विवाह करताना मी समाधानी होतो. ही संस्था एकदा लग्न झाल्यावर आपल्या परिवारात सर्वांना समाविष्ट करून घेते व त्यांच्याकडे वेळोवेळी लक्ष देते.

श्री. सुतार महेश वसंत

Be a pillar. Be a Donor.