लोकमंगल अन्नपूर्णा योजना

४८%


उद्दिष्ट

स्वतःसाठी अन्नाची व्यवस्था करण्यासाठी असहाय्य ज्येष्ठ नागरिकांना हाल सोसावे लागू नयेत यासाठी.का आणि कसे

अन्न ही जीवनाची मूलभूत गरज आहे.

भारताच्या प्राचीन व समृद्ध संस्कृतीमध्ये अन्नाचे महत्व सांगणारा समग्र दृष्टीकोन मांडण्यात आला आहे. आपल्या संस्कृतीमध्ये अन्नदान हे अतिशय महान आणि पवित्र कृत्य मानले जाते. अन्न केवळ भूक भागवत नाही तर ते मन व आत्माही तृप्त करते.


स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सहा दशके उलटूनही आजचे हे भीषण वास्तव आहे की भारतामधील सर्व नागरिकांना दोन वेळा चौरस आहार मिळत नाही. आर्थिकदृष्ट्या दुर्बल अथवा शारीरिकदृष्ट्या अपंग ज्येष्ठ नागरिक, ज्यांना त्यांच्या कुटुंबांद्वारे दुर्लक्षित केले गेले आहे अथवा त्यांचे कुटुंब नाही आणि वृद्धापकाळात सांभाळ करणारे कोणी नाही, प्रामुख्याने अशा ज्येष्ठांना या परिस्थितीस तोंड द्यावे लागते.


या परिस्थितीचा विचार करून लोकमंगल फाऊंडेशनने ८ मार्च २०१३ पासून लोकमंगल अन्नपूर्णा योजना सुरू केली. आपले अन्न मिळवू न शकणार्‍या दुर्दैवी ज्येष्ठ नागरिकांच्या चेहेर्‍यावर हसू फुलविणे हे या योजनेचे लक्ष्य आहे.


आपल्या कुटुंबियांकडून दुर्लक्षित अथवा ज्यांना कुटुंब नाही अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी (६० वर्षांहून अधिक वयाचे) या योजनेअंतर्गत दिवसातून दोन वेळा घरपोच जेवण पुरविले जाते. वर्तमानपत्रांमध्ये जाहिरातींद्वारे गरजू ज्येष्ठ नागरिकांच्या डेटाबेसचे संकलन केले जाते. स्वयंपाकाची एक मोठी व स्वच्छ यंत्रणा या योजनेसाठी कार्यरत आहे. जेथे, आचारी व सहाय्यक गट समर्पित वृत्तीने अन्न शिजविण्याचे काम करतात. तेवढ्याच निष्ठेने स्वयंसेवकांचा दुसरा गट हे भोजनाचे डबे शहराच्या वेगवेगळ्या भागातील गरजू लोकांच्या घरी पोहोचविण्याचे काम करते.


या कार्याचा विस्तार वाढवीत नेत १,५०० ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभार्थी म्हणून समाविष्ट करून घेण्याचा फाउंडेशनचा उद्देश आहे.
ऊन पावसाची पर्वा न करता, आमचे कार्यकर्ते वर्षभर दररोज अथक काम करत आहेत व ज्येष्ठ नागरिकांना हा अन्नपुरवठा अव्याहत सुरू आहे.


हा प्रकल्प सध्या सोलापूरमधील ज्येष्ठ नागरिकांसाठी चालविला जात आहे. भारतातील प्रत्येक गरजू वरिष्ठ नागरिकांना दररोज पुरेसे भोजन पुरविता यावे ही आमची प्रामाणिक इच्छा आहे.


बजेट

प्रति टिफिन, प्रति महिना १५०० x ४५० (लाभार्थी) = ६,७५,००० प्रति महिना

आपणही एक आधारस्तंभ बना.