जलसंधारण प्रकल्पउद्दिष्टे

 • या प्रकल्पामार्फत पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी.
 • उपलब्ध जलस्रोतांचे व्यवस्थापन करण्यासाठी.

का व कसे

शेती हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. आपणा सर्वांना या देशाचे नागरिक या नात्याने, शेतामध्ये घाम गाळून धान्य पिकविणार्‍या शेतकर्‍यांचा अभिमान वाटावयास हवा. योग्य प्रशिक्षण व समान संधी मिळाल्यास भारतातील शेतकर्‍यांमध्ये संपूर्ण देशाला पोसण्याची क्षमता नक्कीच आहे.

प्रत्यक्षात मात्र जे चित्र आपल्याला दिसते ते भिन्न व निराशाजनक आहे. दुष्काळ आणि पूर यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांची व पर्यायाने शेतकर्‍यांची हानी होते. वारंवार येणार्‍या या आपत्तींमुळे होणारे हे नुकसान असहनीय आहे. लहरी निसर्गावर अवलंबून असल्यामुळे शेतकर्‍यांना अनेकदा या नुकसानीस तोंड द्यावे लागते. विशेषतः पर्जन्यमान कमी असणार्‍या प्रदेशातील शेतकर्‍यांना.

या परिस्थितीच्या विरोधात लढण्यासाठी लोकमंगल फाऊंडेशनने लोकमंगल जलसंधारण पॅटर्न बी. बी. चा आरंभ केला आहे. हा पॅटर्न ही पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी असणारी एक सिंचन योजना आहे. संपूर्ण संशोधनानंतर, आम्ही एखाद्या विशिष्ट क्षेत्रात जल संसाधने व्यवस्थापित करण्याच्या योजना आखत आहोत. त्या योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी आम्ही आवश्यक ते उपायही करीत आहोत.

हा प्रकल्प जेथे जेथे अंमलात आला आहे तेथे तेथे तो प्रचंड यशस्वी झाला आहे. या प्रकल्पाद्वारे शेतीसाठी असणार्‍या पाण्याच्या उपलब्धतेमध्ये वाढ झाली आहे, प्रति टन उत्पन्नामध्ये वाढ झाली आहे, पाण्याची पातळी वाढली आहे आणि या समृद्धीला संबंधित क्षेत्रातील शेतकरी दाद देत आहेत. शेतकरी म्हणजे आपले पोशिंदा, आमच्या या लहानश्या प्रयत्नांनी त्यांच्या चेहेर्‍यावर आम्ही हास्य फुलवू शकलो याचा आम्हास आनंद आहे. बहुतांश भागांमधून पाण्याच्या समस्येचे मूळापासून उच्चाटन करणे हे आमचे लक्ष्य आहे.

जलसंधारण लोकाभियान ( गाळमुक्त हिप्परगा तलाव):


उद्दीष्ट

हिप्परगा तलावाची साठवण क्षमता वाढविण्यासाठी तलावाच्या कडेच्या बाजूच्या २६ किमी परिसरातून गाळ (काळी माती) काढून तिचे शेतकर्‍यांना मोफत वाटप करणे. या मातीचे प्रयोगशाळेत परीक्षण केले असता ती पिकांच्या लागवडीसाठी उत्कृष्ट असल्याचे निदर्शनास आले आहे. चालू हंगामात आम्ही किमान १.२५ लाख ट्रक गाल काढून टाकण्याची योजना आखत आहोत.


माहिती

हिप्परगा तलाव हा सोलापूर शहराजवळील सर्वात मोठा जलसाठा आहे. हा तलाव सन १८६६ च्या सुमारास बांधला गेला. तलावाची एकूण जल साठवण क्षमता ३.३३ टीएमसी आहे. परंतु कालांतराने काळी माती (गाळ) जास्त प्रमाणात साठत गेल्यामुळे तलावाच्या साठवण क्षमतेत सुमारे ४५% घट झाली आहे.


तपशील

 • बांधकाम: सन १८६६ ते सन १८७१
 • साठवण क्षमता: ३.३३ टीएमसी (९४.३० दशलक्ष घन मीटर)
 • तलावाची लांबी: २१३४ मीटर
 • तलावाची रुंदी: ७.६० मीटर
 • तलावाची उंची: २४.४५ मीटर

पाण्याचा वापर:

 • पिण्यासाठी १४.५५ दशलक्ष घनमीटर
 • उद्योगाच्या उद्देशासाठी: ०.१० दशलक्ष घन मीटर
 • लागवडीसाठी: ४६.५१ दशलक्ष घनमीटर

काळ्या मातीचे (गाळ) प्रमाण :

 • २६.४४ दशलक्ष घनमीटर (महाराष्ट्र अभियांत्रिकी संस्था, नाशिक द्वारा सन १९९१ मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार)
 • ३२.२६ दशलक्ष घनमीटर (महाराष्ट्र अभियांत्रिकी संस्था, नाशिक द्वारा सन २००२ मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार)
 • २०१६ मधील अंदाजानुसार गाळाचे प्रमाण सुमारे 42 दशलक्ष घनमीटर, जे एकूण साठवण क्षमतेच्या सुमारे ४५% आहे.
 • (नोंद: ४२ दशलक्ष घनमीटर = २६,००,००० ट्रक (१ ट्रक = ५ ब्रास))/li>
 • प्रकल्पाचा कालावधी: ५ जानेवारी २०१६ ते ५ जुलै २०१६ पर्यंत
 • बजेट दर: एक्सकॅव्हेटरद्वारे काळी माती(गाळ) लोड करणे - ३०० प्रति ट्रक
 • वाहतूकः १५० किमी
 • एकूण किंमत (१० किमी पर्यंत)
 • १५०० + ३०० = १८००
  १८०० * २६,००,००० = ४६८,००,००,०००
  (नोंद: वास्तविक बजेट अंतरांनुसार बदलू शकते. सर्व आकडेवारी रुपयांमध्ये आहे.)

आपणही एक आधारस्तंभ बना.