• अन्न हे
  पूर्णब्रह्म

 • शिक्षणाने बदलून जाईल त्यांचे विश्व

 • आजचे संधारण ही
  उद्यासाठी साठवण

 • शुभारंभ

  नवजीवनाचा, सहजीवनाचा

लोकमंगल फाऊंडेशनमध्ये आपले स्वागत

ग्रामीण भागाच्या विकासासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. त्यांच्या उन्नतीसाठी आमचे विविध प्रकल्प समर्पित आहेत. या चांगल्या कामाचा प्रसार संपूर्ण भारतभर व्हावा ही आमची मनोकामना आहे. या कार्यासाठी देणगी व योगदान देण्यासाठी तुमचे नेहेमीच स्वागत आहे.

मने जोडणे

भार हलका करणे

ज्यांची आर्थिक स्थिती चांगली नसते, त्यांच्यासाठी लग्न हा मोठा खर्चिक सोहळा ठरतो. त्यांच्या मुलांच्या विवाहांचे आयोजन करणे.

आत्मिक समाधान

मानसिक शांतता

ठराविक वयानंतर पोटासाठी राबणे कठीण होऊन जाते. अशा वडीलधार्‍यांसाठी पोटभर जेवण पुरविणे व त्यायोगे मनेही संतुष्ट करणे.

पाण्याचे जतन

भविष्याचे जतन

पाण्याचे संधारण ही काळाची गरज आहे. दुष्काळाला तोंड देणार्‍या गावातील जलस्रोतांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी उपाययोजना करणे.

आमचे प्रकल्प

लोकमंगल अन्नपूर्णा योजना

कुटुंबाकडून दुर्लक्षिल्या गेलेल्या ज्येष्ठ नागरिकांना पुरेसे अन्नही न मिळणे ही त्यांची सर्वात मोठी उपेक्षा ठरते. आम्ही त्यांना दिवसातून दोन वेळा पोषक व पोटभर जेवणाचा डबा पुरवितो.

४८%

जलसंधारण प्रकल्प

सोलापूरसारख्या जिल्ह्यांना वारंवार दुष्काळाला तोंड द्यावे लागते. लोकमंगल जलसंधारण पॅटर्न बी.बी. ही शेतीला समृद्धी प्राप्त करून देण्यासाठी एक सिंचन योजना आहे.


लोटस (लोकमंगल ऑर्गनायझेशन फॉर टीचिंग अंडरप्रिव्हिलेज्ड स्टुडंट्स)

शिक्षणामुळे जीवन बदलते. शिक्षणाचे स्वप्न तर विद्यार्थी पाहतात, परंतु आर्थिक अडचणी या त्यांच्या शिक्षणामधील अडथळा ठरतात. अशा गरजू विद्यार्थ्यांची जबाबदारी आम्ही घेतो व त्यांना त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यास मदत करतो.

सामुदायिक विवाह सोहळा

विवाह म्हणजे आयुष्यातील महत्वाचा क्षण. परंतु आपल्या समाजातील आर्थिक दुर्बल घटकांवर त्याचा मोठा बोजा पडू शकतो. त्यांच्या विवाहाची सारी व्यवस्था करण्यासाठी आम्ही त्यांना साहाय्य करतो.


लोकमंगल फाऊंडेशन विषयी

What We Do

आमचे कार्य

लोकमंगल फाउंडेशन ग्रामीण समाजाच्या उन्नतीसाठी काम करते. आम्ही त्यांचे जीवन सुधारण्याचा प्रयत्न करतो. सध्या आम्ही चार प्रकल्पांवर काम करीत आहोत.

Pillers

स्तंभ

 • लोकमंगल अन्नपूर्णा योजना
 • जलसंधारण प्रकल्प
 • विद्यादान योजना
 • सामुदायिक विवाह सोहळा

या प्रकल्पांच्या साहाय्याने आम्ही प्रयत्न करत आहोत

 • निराधार ज्येष्ठांना सकस आणि पुरेसे अन्न देण्यासाठी
 • पाण्याच्या कमतरतेची समस्या दूर करण्यासाठी
 • प्रत्येक गरजू विद्यार्थ्यास शिक्षण देण्यासाठी
 • विवाहावरील खर्चांचा बोजा कमी करण्यासाठी

व्हिजन आणि मिशन

 • ग्रामीण समाजाचे जीवनमान उंचावणे.
 • संपूर्ण देश अनुसरण करू शकेल अशी मॉडेल विकसित करणे.
 • ग्रामीण समाजाच्या विकासासाठी तत्पर राहणे.

विशेष उल्लेखनीय स्वयंसेवक

राहुल कोल्हटकर

सोलापूर

राजेश

सोलापूर

कोलीकाका

सोलापूर

असिफ शेख

सोलापूर

आमच्यासह जोडले जाण्यासाठी

दाता बना

या कार्याची व्याप्ती वाढविण्यासाठी जेवढा अधिक हातभार लागेल तो स्वागतार्ह आहेच. आपण दिलेली देणगी गरजूंपर्यंत पोहोचेल. मुलांच्या विवाहासाठी काढलेले कर्ज न फेडता येणे हे शेतकर्‍यांच्या आत्महत्येमागचे एक प्रमुख कारण आहे. आपल्या देणगीमुळे एखाद्या जोडप्याचा विवाह होऊ शकतो जेणेकरून त्यांच्या पालकांना कर्ज काढण्याची आवश्यकता राहणार नाही. मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागणार नाही. आपल्या देणगीमुळे त्यांचे जीवन बदलून जाऊ शकते. या बदलांचे माध्यम बनण्यासाठी पुढे या.


0+

स्वयंसेवक

0+

देणगीदार

0+

वर्षांचा अनुभव

0

यशस्वी प्रकल्प

लाभार्थींचे अभिप्राय

कार्यक्रम

Events
कार्यक्रम

शिवपुत्र शंभू राजे महानाट्य

शंभू राजांच्या भूमिकेत डॉ. अमोल कोल्हे आणि अन्य २५० कलाकारांसह या ऐतिहासिक नाटकाचे आयोजन केले गेले.

कार्यक्रम

शिवपुत्र शंभू राजे महानाट्य

Events
कार्यक्रम

सामुदायिक विवाह सोहळा

दर वर्षीप्रमाणे उस्मानाबाद येथे सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले गेले, ज्यामध्ये शेकडो जोडप्यांचे विवाह संपन्न झाले.

कार्यक्रम

सामुदायिक विवाह सोहळा

Event
कार्यक्रम

लोकमंगल शिक्षक रत्न पुरस्कार

श्रीमती लीलाताई कोटी यांना लोकमंगलचा डॉ. अब्दुल कलाम पुरस्कार प्रदान करण्यात आला. अकरा शिक्षक आणि दोन शाळांना विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले.

कार्यक्रम

आपणही एक आधारस्तंभ बना.