• फोन : ९०२८७७५५९०
  • ई-मेल : lokmangalgroups@gmail.com
  • English | मराठी

सामान्य प्रश्न

लोकमंगल फाऊंडेशन कोणासाठी काम करते?

लोकमंगल फाउंडेशन ग्रामीण भागातील लोकांसाठी काम करते. आम्ही ग्रामीण समाजाच्या उन्नतीसाठी काम करतो.

आम्ही कशाप्रकारे मदत करू शकतो?

मला एखाद्या मुलाची जबाबदारी घेता येऊ शकते का?

होय, तुम्ही लोकमंगल फाऊंडेशनमध्ये विद्यार्थ्यांना प्रायोजित करू शकता.

माझी देणगी कर सवलतीस पात्र आहे का?

होय, आम्ही एक नोंदणीकृत चॅरिटेबल ट्रस्ट आहोत. आयकर अधिनियम, १९६१च्या कलम ८० जी अंतर्गत आपल्या देणग्या कर सवलतीस पूर्णपणे पात्र आहेत.

मला आपल्याशी कशाप्रकारे संपर्क साधता येईल?

या माहितीसाठी कृपया आमचे संपर्क पृष्ठ पहा.

तुमचे प्रकल्प महाराष्ट्राव्यतिरिक्त इतर राज्यांना लागू आहेत का?

होय, आम्ही इतर राज्यांमधील ग्रामीण समाजांसाठी देखील काम करू इच्छितो.

परदेशी नागरिकांना ऑनलाईन देणगी देता येईल का?

होय, अधिक माहितीसाठी कृपया देणगी च्या पृष्ठाला भेट द्या.

माझ्या देणगीचा वापर कोठे केला जाईल?

आपल्या देणगीचा विनियोग आमच्या चार प्रकल्पांपैकी आवश्यकता असेल त्या प्रकल्पासाठी केला जाईल. आपण कोणत्याही विशिष्ट प्रकल्पासाठी देणगी देऊ इच्छित असल्यास, आम्हाला सूचित करू शकता जेणेकरून आपल्या देणगीचा विनियोग त्या प्रकल्पासाठीच केला जाईल.

मी लोकमंगल फाऊंडेशनला मदत का करावी?

लोकमंगल फाऊंडेशन ग्रामीण समाजाच्या उन्नतीसाठी काम करते. त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आम्ही सर्वतोपरी कार्यरत आहोत. जर आपणास असे वाटत असेल की या समाजानेही काळासोबत पुढे जावे, तर आपणही आमच्याबरोबर सहभागी व्हा.

लोकमंगल फाऊंडेशन फक्त ग्रामीण समाजासाठीच का काम करते?

ग्रामीण भागातील जनतेला बहुतेक वेळा आर्थिक कमतरतेला तोंड द्यावे लागते तसेच या भागात आधुनिक सोयी सुविधांचाही अभाव असतो. आर्थिक कमतरतेमुळे त्यांच्यावर पडणारा भार हलका करण्याचा प्रयत्न लोकमंगल फाऊंडेशन आपल्या प्रकल्पांद्वारे करीत आहे. तसेच त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयास करीत आहे.

आपणही एक आधारस्तंभ बना.