योगदान द्या

आपल्या समर्पित वृत्तीचे आम्ही स्वागत करतो. गरजू लोकांना मदत करण्याची आपली वृत्ती हे सत्कर्मच आहे. सत्कर्माच्या या मार्गावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही आपल्यासह आहोतच. आपण आमच्या कोणत्याही प्रकल्पासाठी स्वयंसेवक बनू शकता आणि आम्ही त्या कार्यात सहभागी होण्यासाठी आपल्याला मदत करू. आपल्या वेळ मौल्यवान आहे आणि आम्ही त्याचा आदर करतो. आपल्याला आपला वेळ व प्रयत्न समर्पित करण्याची इच्छा असल्यास आम्हाला आपल्यासाठी उपयुक्त असे काम शोधण्यास आनंद वाटेल.


कॉपोर्रेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) म्हणून कंपन्या समाजासाठी काम करतात. बर्‍याच कंपन्या दानधर्म करतात ते केवळ कायदेशीर दायित्व म्हणून नव्हे, तर समाजामध्ये सद्भावना निर्माण करण्यासाठी. या समाजाचा एक भाग म्हणून आपले कर्तव्य पूर्ण करताना आपल्यासारख्या कंपन्या यंदा लोकमंगल फाऊंडेशनच्या कार्यास हातभार लावू शकतात. सीएसआर उपक्रमांमुळे कंपन्या समाजासाठी योगदान देऊ शकतात तसेच आपल्या कर्मचार्‍यांमध्ये जबाबदारीची जाणीवही निर्माण करू शकतात.आपण देणगीस्वरूप पैसे देऊ शकता, ज्यांचा आमच्या एखाद्या प्रकल्पासाठी विनियोग केला जाऊ शकतो. आपण दिलेली देणगी ही कर सवलतीचा लाभ मिळविण्यास पात्र आहे. आपण रोख रक्कम अथवा वस्तूंच्या स्वरुपातही देणगी देऊ शकता. आम्हासाठी सर्व प्रकारच्या देणग्या या मोलाच्या आहेत.


आपण लोकमंगल फाऊंडेशनचा कोणताही प्रकल्प अथवा त्यातील काही भाग प्रायोजित करू शकता. आपली प्रायोजकता गरजू वृद्धांना अन्न पुरवू शकते अथवा गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी अथवा नवविवाहितांना त्यांचे जीवन सुरू करण्यास साहाय्यकरक ठरू शकते अथवा एखाद्या गावाचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी लाभदायक ठरू शकते. यासाठी आपण पुढाकार घ्या, आपल्या मदतीचा हात द्या, स्वप्ने उभारण्यासाठी मदत करा. आत्मिक समाधानाचा अनुभव घ्या.


प्रायोजक

आपण आपल्या सोयीनुसार खालील प्रकल्पांना पूर्णपणे किंवा अंशतः प्रायोजित करू शकता.


१. लोकमंगल अन्नपूर्णा योजना


चला, आपल्याला घडविणार्‍या पिढीची काळजी घेऊया. आपल्याला घडवणारी पिढी आज स्वतः मोडून पडण्याच्या उंबरठ्यावर आहे. आज ते वयाच्या अश्या टप्प्यावर आहेत जेथे ते स्वतःसाठी भाकरी मिळविण्यासही असमर्थ आहेत. चला, त्यांना पोषणपूर्ण आहार देऊया. दरमहा रु. ५,७०,००० (१५०० x ३८० लाभार्थी) खर्च केले जात आहेत. लोकमंगल अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत आपण या गोष्टी प्रायोजित करू शकता

 • एका गरजू ज्येष्ठ नागरिकाचे एक वेळचे भोजन
 • एका गरजू ज्येष्ठ नागरिकाचे एका दिवसाचे भोजन
 • एका गरजू ज्येष्ठ नागरिकाचे एका आठवड्याचे भोजन
 • एका गरजू ज्येष्ठ नागरिकाचे एका महिन्याचे भोजन
 • एका गरजू ज्येष्ठ नागरिकाचे एका वर्षाचे भोजन
 • विशिष्ट भागातील ज्येष्ठ नागरिक
 • विशिष्ट कालावधीसाठी ज्येष्ठ नागरिक

२. जलसंधारण प्रकल्प


चला, पृथ्वीचे रक्षण करूया. पाण्याचे स्त्रोत दुर्मिळ होत चालले आहेत. जलसंधारण प्रकल्पासह आम्ही जलस्रोतांचे संरक्षण आणि त्यांच्या संख्येत वाढ व्हावी यासाठी प्रयत्न करत आहोत.
या प्रकल्पांतर्गत, आपण आपण या गोष्टी प्रायोजित करू शकता

 • संपूर्ण प्रकल्प
 • आवश्यक उपकरणे

३. विद्यादान योजना


चला, पुढच्या पिढीला शिक्षित करूया. आमच्याकडे असणार्‍या विद्यार्थ्यांपैकी एखाद्यासाठी आपण रक्कम दान करू शकता व त्यायोगे त्यांच्या शिक्षणाची आर्थिक जबाबदारी उचलू शकता.
आमच्याकडे असलेल्या विद्यार्थ्यांना आपण वैयक्तिकरित्या भेटू शकता आणि त्यापैकी कोणाचे शिक्षण प्रायोजित करू शकता.


४. सामुदायिक विवाह सोहळा


चला, नवी स्वप्ने फुलविण्यास मदत करूया. तरुण पिढीच्या नवजीवनाचा प्रारंभ होत आहे. त्यांच्या विवाहाचे प्रायोजकत्व घेऊन त्यांना मदत करूया. सामुदायिक विवाह सोहळा प्रकल्पाच्या अंतर्गत आपण या गोष्टी प्रायोजित करू शकता

 • लग्नाचा पोशाख, दागदागिने आणि गृहोपयोगी वस्तू
 • एका जोडप्याचा विवाह
 • संपूर्ण कार्यक्रम

आपणही एक आधारस्तंभ बना.