लोकमंगल फाऊंडेशनबद्दल

ग्रामीण भारताला त्याचे गतवैभव पुन्हा एकदा प्राप्त करून देण्यासाठी लोकमंगल फाऊंडेशन कार्यरत आहे. ग्रामीण समाजाच्या सर्व स्तरातील व सर्व विभागातील नागरिकांना त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आम्ही सर्वतोपरी साहाय्य करू इच्छितो. समाजातील गरजू मुलांच्या शिक्षणापासून त्यांच्या विवाहापर्यंत, शेतीला पाणी पुरवठा करण्यापासून निराधार ज्येष्ठ नागरिकांना अन्न पुरवण्यापर्यंत सर्व प्रकारे हातभार लावण्याचा आम्ही निर्धार केला आहे. ग्रामीण समाजाचा चेहरा मोहरा बदलून जाईल अशा मॉडेलसह आम्ही काम करीत आहोत. संपूर्ण देशासाठी उपयोगी पडू शकेल, अशा पद्धतीने हे मॉडेल आणखी विकसित करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. या मॉडेलसह ग्रामीण समाजाच्या उज्वल भविष्याचे स्वप्न आपण नक्कीच पाहू शकतो.

ग्रामीण विभागास एक चांगले जीवनमान प्रदान करण्याच्या दृष्टीकोनातून मा. ना. श्री. सुभाष(बापू) देशमुख (विद्यमान मंत्री - सहकार, पणन व वस्त्रोद्योग खाते, महाराष्ट्र राज्य) यांनी सन २००५ मध्ये लोकमंगल फाऊंडेशनची स्थापना केली. ग्रामीण भागातील गरजू नागरिकांना त्यांचे भविष्य उत्तम घडविण्यासाठी लोकमंगल फाऊंडेशन सहकार्य करते. या नागरिकांना चांगल्या संधी मिळाल्यास त्यांचे जीवन बहरून येईल. लोकमंगल फाऊंडेशन सध्या सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कार्यरत आहे. तथापि, आगामी काळात आपल्या विकासाच्या मॉडेल्ससह अन्य जिल्ह्यातील ग्रामीण भागांची प्रगतीही साध्य करण्याचे फाऊंडेशनचे ध्येय आहे.

विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील हजारो नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिणाम घडवून आणणे हे लोकमंगल फाऊंडेशनचे लक्ष्य आहे. आज महाराष्ट्रातील एक प्रतिष्ठित एनजीओ म्हणून आम्ही उदयास येत आहोत. आम्ही ग्रामीण समाजाचा कायापालट घडवून आणत आहोत. या प्रक्रियेत आपल्यासारख्या दात्यांसह काम करणे हा आमचा बहुमान असेल. या कार्यासाठी आपण आर्थिक अथवा विना आर्थिक योगदानही देऊ शकता. आपले अल्पसे योगदानही कोणाच्या आयुष्यात मोठे परिवर्तन घडवू शकते. बदलाच्या या प्रवाहात आपणही एक माध्यम बना.

आम्ही गरजू लोकांना मदत करत आहोत याचा आम्हाला अभिमान आहे. संपूर्णतः निष्ठेने, झोकून देऊन आम्ही हे कार्य अखंड सुरू ठेवू.

संपूर्ण निष्ठेने व सेवाभावी वृत्तीने काम करणारे कार्यकर्ते आम्हाला लाभले आहेत. त्यांच्यामुळे हे कार्य यशस्वीपणे निभावले जाते. या कार्यासाठी आपले योगदान देऊ इच्छिणार्‍यांना आम्ही नेहेमीच जोडून घेऊ इच्छितो.

गरजूंची सेवा करणे हे आमचे कार्य आहे. आपणही या प्रकारचे कार्य करण्यास उत्सुक असाल तर आमच्यासह जोडले जा. तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांचे नेहेमीच स्वागत आहे.

0+

वर्षांचा अनुभव

0+

यशस्वी प्रकल्प

0+

स्वयंसेवक

0+

देणगीदार

आमची टीम

Rohan Deshmukh

रोहन देशमुख

अध्यक्ष

Shahaji Pawar

शहाजी पवार

उपाध्यक्ष

Vijay Jadhav

विजय जाधव

सचिव

Abhay Patani

अभय पटनी

खजिनदार

Avinash Mahagaonkar

अविनाश महागावकर

संचालक

Sunil Gund

सुनील गुंड

संचालक

Avanti Deshmukh

अवंती म देशमुख

संचालक

संदीप पिस्के

विभाग प्रमुख, लोकमंगल फाऊंडेशन

आपणही एक आधारस्तंभ बना.